आपल्या काळातील सर्वात मोठ्या संकटाशी लढा

पर्यावरणाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जलसाठ्याचे पुनर्जीवीकरण, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम, कचरा व्यवस्थापन यंत्र, स्वच्छता मोहीम व सेंद्रिय शेती

icon

रणनीती

  • मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणासारखे सामाजिक प्रकल्प सुरू करा.

  • मातीची गुणवत्ता टिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करा.

icon

प्रभाव

  • जगभरात झाडे लावली

  • नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे

icon

व्याप्ती

  • कचरा व्यवस्थापन प्लांट बसवले

  • शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले

आढावा

आपली नैसर्गिक संसाधने मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. आपल्याला पिण्याचे शुद्ध पाणी रसायन मुक्त उत्पादने व स्वच्छ हवा देखील मिळत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास केवळ आपल्यासाठीच नाही तर अर्थव्यवस्थेसाठी देखील चांगला नाही. एका अंदाजानुसार पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे भारताला दरवर्षी १८ अब्ज डॉलर्स चा खर्च येतो जो सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजे ६% आहे. आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन जगभरातील स्वयंसेवकांनी पर्यावरणाच्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पांमध्ये मिशन ग्रीन अर्थ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, सुकलेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, मंदिरातील कचऱ्याचे व्यवस्थापन व मातीची गुणवत्ता टिकवून ठेवणारी नैसर्गिक शेती चा समावेश आहे. आपले प्रकल्प मुख्यतः नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व या प्रक्रियेत स्थानिक लोकांचे जीवनमान सुरक्षित करण्या भोवती फिरतात. आपल्या देशात येऊ घातलेल्या जल संकटाचा सामना करण्यासाठी नद्या आणि उपनद्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे.

आपण पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे, या जगाचे नागरिक म्हणून हे आपले पहिले आणि मुख्य कर्तव्य आहे. आपण जर पर्यावरणाची काळजी घेतली तर ते आपली काळजी घेईल आणि आपल्याला आरोग्य, समृद्धी आणि आनंद मिळेल

- गुरुदेव श्री श्री रवि शंकर

परिणाम

icon

वृक्ष

जगभरात लागवड

icon

शेतकऱ्यांना

नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण

icon

नद्या

आणि त्यांच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे

icon

५१२ टन कचरा

स्वच्छ यमुना अभियानात काढण्यात आला.

icon

स्वच्छता मोहीम

यशस्वीरित्या पार पडल्या.

icon

ठिकाणी कचरा व्यवस्थापन

महत्त्वाच्या संयंत्रे बसविण्यात आली

icon

सगळ्या संयंत्रांची दैनंदिन कचरा व्यवस्थापन प्रक्रिया क्षमता

तुमच्या समर्थनामुळे आम्ही आणखी बरेच काही साध्य करू शकतो

सामाजिक उपक्रमांच्या बहुआयामी दृष्टिकोनाने अनेकांचे जीव वाचवले आहे, अनेकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवले आहे व समुदायांना प्रगतीचा अनुभव घेण्यास मदत केली आहे. प्रत्येक सेवा कार्य हे मानवतेचा दृष्टिकोन अग्रभागी ठेवून काळजीपूर्वक विश्लेषण करूनच केले जाते.