वज्रासन म्हणजे काय

‘वज्र’ म्हणजे हिऱ्याच्या आकाराचा किंवा गडगडाट; ‘आसन’ म्हणजे मुद्रा किंवा स्थिती. वज्रासनाचे नाव हिरा किंवा वज्राच्या आकारावरून ठेवण्यात आले आहे. असे आसनजे सर्वसमावेशक आसन आहे आणि जे आपण सहजपणे करू शकता तसेच त्याचे विविध लाभ मिळवू शकता, तर ते वज्रासन आहे. वज्र-आसन हे एक बहुमुखी आसन आहे जे ध्यानासाठी, बसल्या स्थितीतील इतर आसनांमध्ये विश्रांतीसाठी तसेच पचनास सहाय्यक म्हणून उपयुक्त आहे. वज्र-आसन ही अंजनेय-आसन (नमस्कार आसन) आणि उष्ट्र-आसन (उंट) यासारख्या इतर विविध योगासनांच्या मधली एक स्थिती आहे.

वज्रासन कसे करावे

  1. वज्रासन हे बैठ्या स्थितीतील आसन आहे. सुरवातीला आपल्या टाचांवर बसून आपले गुडघे आणि पाय जुळवून ठेवा.
  2. पाठ सरळ ठेवून हाताचे तळवे मांडीच्या वर ठेवा.
  3. आपल्या नाकाद्वारे हळूवारपणे श्वास घ्या आणि किमान तीन मिनिटे या स्थितीत बसा.

कालावधी/पुनरावृत्ती: 

वज्रासन आरामदायक वाटेल तोपर्यंत ठेवता येते. आणि हा कालावधी ज्या कारणासाठी आसन करत आहात त्यावर ठरवला जातो. 

व्हिडिओ: वज्रासन

वज्रासनाचे फायदे

  1. खालच्या ओटीपोटात रक्तसंचार वाढवते, त्यामुळे पचन सुधारते.
  2. पोटातील गॅसेस आणि वेदना कमी करते.
  3. पाय आणि मांड्यांच्या नसा मजबूत करते.
  4. गुडघे आणि घोट्याचे सांधे लवचिक बनवते, त्यामुळे संधिवाताच्या आजारांना प्रतिबंध होतो.
  5. विनासायास मान आणि पाठीचा कणा सरळ आणि ताठ होतो, पाठीच्या नाड्या (ऊर्जा वाहिन्या) मध्ये ऊर्जा प्रवाह सहजपणे होऊ लागतो.
  6. कंबर आणि नितंबाच्या भागाला आराम मिळतो, त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होतात.
  7. प्राणायामाच्या सरावासाठी आधारभूत स्थिती म्हणून कार्य करते, तसेच ध्यानासाठी पूर्वतयारीची स्थिती म्हणून कार्य करते.
  8. पाठदुखीचा त्रास कमी होण्यास मदत लाभते.

सावधगिरी

काही शारीरिक परिस्थिती आपल्यावर बंधने घालतात. खालील प्रकरणांमध्ये, लोकांनी वज्रासन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • ज्यांना पाय, घोटा आणि गुडघ्यांमध्ये खूप त्रास किंवा ताठरपणा आहे.
  • ज्यांना स्लिप डिस्क आहे.
  • ज्यांना हातापायांच्या हालचालीत अडचण येते त्यांनी खूप काळजी घ्यावी.

वज्रासनाचे विशेष घटक

  • हे एकमेव योगासन आहे जे आपण अन्न ग्रहण केल्यानंतर करू शकतो. जेवणानंतर वज्रासनात बसल्यास अन्नाचे पचन चांगले होते.
  • या आसनामुळे शरीराच्या खालच्या भागात रक्त प्रवाह कमी होतो, त्यामुळे वरच्या भागात – पचनसंस्था, फुफ्फुसे आणि मेंदूमध्ये रक्ताभिसरण वाढते.
  • या आसनाचा विशेष पैलू असा आहे की ते मूळ आसन आहे – ज्यातून गोमुखासन, उष्ट्रासन आणि शिशुआसन यासारखी इतर अनेक आसने सुरू होतात. प्राणायाम करताना वज्रासनातही बसता येते. तसेच या आसनात फक्त बसणे देखील फायदेशीर आहे!

बदल आणि फरक

बदल करण्यासाठी: जर आपणास टाचांवर थेट बसणे खूप अवघड असेल, तर आपल्या मांड्या आणि टाचांच्या मध्ये उशी किंवा कापड ठेवा. जर या आसनाने खालच्या भागाला रक्तपुरवठा बंद झाला तर आसन त्वरित सोडा. 

या आसनास आव्हानात्मक करण्यासाठी: या योगासनात टाचांवर बसल्यावर पायाची बोटे वळवा. असे केल्याने पायाच्या बोटांना गहिरा ताण निर्माण होतो.

तयारी आणि या सोबत करण्याची आसने

  • सुखासन (तयारी)
  • पवनमुक्तासन (तयारी)
  • शिशुआसन (तयारी)
  • पश्चिमोत्तनासन (फॉलो अप)
  • बद्धकोनासन (फॉलो अप)

सर्व पहा – बसल्या स्थितीतील योगासने जी उत्साह वाढवत आराम देऊ शकतात

सर्व योगासने
मागील योगासन : चक्की चलनासन
पुढील योगासन : गोमुखासन

वज्रासनावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वज्रासनाचे फायदे: मुद्रा, रक्त परिसंचरण, पचन, गुडघा आणि घोट्याच्या सांध्याची लवचिकता सुधारते. पाठीच्या खालच्या भागातल्या वेदना आणि मासिक पाळीच्या वेदनापासून आराम मिळतो. वजन कमी करण्यास मदत करते. मन शांत होते, झोप सुधारते. गोमुखासन, उष्ट्रासन आणि शिशुआसन आणि प्राणायामासाठी मूलभूत आसन.
३० सेकंदांनी सुरुवात करा. सोईनुसार कालावधी वाढवा. प्रगत योग अभ्यासक १५ मिनिटांपर्यंत वज्रासनात बसू शकतात.
गुडघ्याची दुखापत, पाय आणि घोट्याच्या ताठरपणामध्ये वज्रासन टाळावे तसेच ज्यांना स्लिप डिस्क आणि पायाच्या हालचालीमध्ये समस्या आहे त्यांनी सुद्धा टाळावे.
वज्रासन हे एकमेव असे आसन आहे जे जेवणानंतर करता येते. यामुळे पचनक्रिया सुधारते.
दोन्हींचे फायदे वेगवेगळे आहेत. सहसा रिकाम्या पोटी चालण्याची शिफारस केली जाते. पण जेवणानंतर लगेच वज्रासन करणे खूप चांगले आहे.
होय, गरोदर स्त्रिया वज्रासनात बसू शकतात कारण त्याचे आरोग्य प्रदान करणारे आणि उपचारात्मक फायदे आहेत.
वज्रासनाचा व्हिडिओ पहा आणि त्याचे टप्पे आणि फायदे यांचे अनुसरण करा. गुडघ्याला दुखापत, पाय आणि घोट्याचा ताठरपणा, स्लिप डिस्क आणि अंगांच्या हालचालीतील समस्या यांमध्ये वज्रासन टाळा.
वज्रासनामुळे संधिवाताच्या आजारांपासून बचाव होतो, गुडघे आणि घोट्याचे सांधे लवचिक होतात.
ज्यांना गुडघ्याला दुखापत, पाय आणि घोट्याचा ताठरपणा, स्लिप डिस्क आणि अंगाच्या हालचालीमध्ये समस्या आहे त्यांनी वज्रासन करू नये.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *