जेव्हा आपण परमाणू भौतिकशास्त्रचा (क्वांटम फिजिक्सचा) अभ्यास करतो , तेव्हा आपण पाहतो की या विश्वातील प्रत्येक गोष्ट कंपनांनी बनलेली आहे. ही कंपने सतत जोडली गेल्यावर प्रकट झालेल्या विश्वाला रूप देतात. जे आपण आपल्या सभोवताली पाहतो. शिवाय सृष्टीचा क्रम समजून घेताना अवकाशातील घटकापासून निर्मितीची सुरुवात झाल्याचे दिसून येते. अवकाशानंतर हवेचे घटक, नंतर अग्नी, पाणी आणि शेवटी पृथ्वी आली. सर्व गोष्टी अंतराळातून आल्या आहेत आणि ते विशाल ईथर/अवकाश हे स्त्रोत आहे जिथून सर्व काही निर्माण झाले आहे.
आपण चार स्थूल घटकांवर परिणाम करू शकतो असे मार्ग आहेत. पंखे आपल्याला हवेचा अनुभव घेण्यास मदत करतात, आपण दोन लाकडी काड्यांसह आग निर्माण करू शकतो आणि आपण पाणी आणि मातीला स्पर्श करू शकतो. तथापि, अवकाश/स्पेस एलिमेंटवर परिणाम होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कंपन किंवा ध्वनी. मंत्रांची संकल्पना केवळ वैदिक साहित्यापुरती मर्यादित नाही. जगभरात सर्व संस्कृतींमध्ये भजन आणि सुरांचे पठण केले गेले आहे. आणि तरीही, आपण जे मंत्र रोज ऐकतो आणि जपतो त्यामागे वेगळे शास्त्र आहे. हे मंत्र कसे कार्य करतात याबद्दल थोडे अधिक समजून घेऊ.

मंत्र काय आहेत? ते कसे काम करतात?
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी एकदा नमूद केले आहे की मंत्राचा अर्थ मनना त्रायते इति मंत्रः – त्या गोष्टीची पुनरावृत्ती जी तुम्हाला मायेच्या (भ्रम) सागरातून तारण्यास करण्यास मदत करते. आपल्याला दररोज संघर्षांचा सामना करावा लागतो, आपल्याला ताणतणाव होतो आणि आपली सर्व शक्ती वाया जाते. अशी एक गोष्ट जी आपल्याला या जगात बुडू देत नाही, मग ती भावना असो वा जगाच्या मायाजालाच्या भ्रमात भरकटू देत नाही, त्याला मंत्र म्हणतात.
या त्रासातून मार्ग काढण्यास मदत करणाऱ्या कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करणे याला मंत्र म्हणतात.
जेव्हा आपण या मंत्रांचे अभियांत्रिकी समजून घेतो, तेव्हा आपण पाहतो की हिंदी आणि संस्कृत देवनागरी लिपीतील मूळ व्यंजन आणि स्वर हे स्वतःच मंत्राचे काही प्रकार आहेत. हे निसर्गाचे ध्वनी आहेत जे एका विशिष्ट क्रमाने संकलित केले जातात, त्यांच्या मागे ऊर्जा असते. हे ध्वनी अशा प्रकारे तयार केले जातात की ते आपल्या जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट पैलूवर प्रभाव निर्माण करण्यास सक्षम असतात.
मंत्रांचा अंतराळ घटकावर कसा परिणाम होतो
मंत्र आपल्या गाभ्यामध्ये बदल घडवून आणतात आणि आपल्या सभोवतालचे वास्तव सकारात्मक रीतीने प्रकट करतात. आणि ते आपल्या सभोवतालच्या अंतराळ घटकाला शांत करून तसे करतात.
जागतिक उष्णता/ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे, हवा शुद्धीकरणाची/एअर प्युरिफायरचे उत्पादन आणि विक्री वाढली आहे. ज्यामुळे आपल्या सभोवतालची हवेची गुणवत्ता सुधारू शकते. पण आपण कधी विचार केला आहे का की आपण अवकाशातील घटक कसे शुद्ध करू शकतो?
हवेच्या प्रदूषणाप्रमाणेच अवकाशातील घटकही नियमितपणे विस्कळीत होतात. अंतरिक्ष तत्त्वाच्या बिघडाला उष्णता क्षयमान/एंट्रॉपी म्हणतात. एंट्रॉपी जेवढी जास्त, अडथळा तेवढाच जास्त. गळून गेल्याची भावना, विचारांचा आणि कल्पनांचा भडिमार झाल्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. एका विशिष्ट वेळी आणि विशिष्ट पद्धतीने मंत्रांचा जप केल्याने अवकाशातील घटकाची एन्ट्रॉपी कमी होण्यास मदत होते. आणि हे मंत्र केवळ आपल्या सभोवतालच्या जागेवरच काम करत नाहीत तर ते आपल्या आतही शांती निर्माण करतात. म्हणूनच लोकांनी नामजपाच्या सत्रानंतर शांततेची एक अद्भुत भावना अनुभवली आहे.
जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्या आत अशी शांत जागा वारंवार निर्माण करता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही शांतता आणि आनंदाची व्यापक भावना अनुभवत आहात. कारण अवकाशात/स्पेस एलिमेंटमध्ये सर्व काही निर्माण होते. आपल्या शरीरातील पेशी रोज तयार होतात आणि त्या या अवकाशातून येतात आणि जेव्हा त्यांचा मृत्यू होतो. तेव्हा त्या त्याच अवकाशातील घटकात जातात. हा आपल्या अस्तित्वाचा स्त्रोत आहे आणि जेव्हा आपण स्त्रोत निश्चित करतो तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वात हळूहळू आणि सकारात्मक बदल घडतात.
वेगवेगळे मंत्र आणि त्यांचे फायदे
वेगवेगळे मंत्र वेगवेगळे कंपने निर्माण करतात आणि ही कंपने आपल्याला विविध फायद्यांकडे घेऊन जातात. मंत्रांचा पंचतत्त्वावर (पाच तत्वांवर) प्रभाव पडतो आणि त्याद्वारे आपले आरोग्य, मानसिक स्थिती आणि मानसिक स्थितीपेक्षा सूक्ष्म अवस्था सुधारल्या जातात. सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक म्हणजे श्री रुद्रम किंवा रुद्र पूजा. अगदी आदि शंकराचार्यांनी एकदा नमूद केले की श्री रुद्रम हे सर्वोत्तम मंत्रांपैकी एक आहे. कारण ते तुम्हाला मुक्ती तसेच सर्व सांसारिक सिद्धी देऊ शकते.
नवशिक्यांसाठी, ओम नमः शिवाय किंवा ओम नमो नारायणाय किंवा ओम श्री गुरवये नमः यांसारखे मंत्र सहजपणे घेतले जाऊ शकतात आणि दीर्घकाळ जप केले जाऊ शकतात.
ओम नमः शिवाय, न म शि वा आणि य हे पाच बीज मंत्र आहेत. हे दिवसाच्या पंचांगाशी किंवा वेळेच्या पाच अंगांशी (भाग) जोडलेले असतात. रोज सकाळी १० ते १५ मिनिटे ओम नमः शिवाय जप केल्याने दिवसाचा पंचांग सुधारेल आणि त्या दिवसासाठी सर्व ग्रहांच्या प्रभावाची काळजी घेतली जाईल. म्हणून, जर तुम्हाला तुमचा दिवस सुधारायचा असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की काही महत्त्वाच्या गोष्टी घडत आहेत आणि तुम्हाला ती अतिरिक्त धार हवी असेल, तर सकाळी १० ते १५ मिनिटे ओम नमः शिवाय चा जप करा. प्रदीर्घ काळ असे केल्यास त्याचे फळ अनेक पटीने मिळते. आर्ट ऑफ लिव्हिंग अॅपवर मंत्रांचा सहज लाभ घ्या.
मंत्रांचा जप १०८ वेळा का केला जातो?
जेव्हा आपण जपमाळ मणी आणि जपमाळ साखळी पाहतो तेव्हा आपल्याला आढळते की त्यामध्ये एकतर १०८ मणी असतात किंवा १०८ पर्यंत गुणाकार करता येतो अशी संख्या असते. तरी बरेच अभ्यासक असे सुचवतात की आपण किमान १०८ वेळा मंत्राचा जप केला पाहिजे. ही संख्या इतकी महत्त्वाची का आहे?
वर नमूद केल्याप्रमाणे, मंत्र आपल्या आणि आजूबाजूच्या अंतराळ घटकांवर परिणाम करतात. अगदी ग्रहांचा प्रभाव अवकाशातील घटकांवरही दिसून येतो. हा अंक १०८ मंत्रांना ज्योतिषशास्त्राशी जोडतो. १२ ज्योतिषीय नक्षत्र आणि नऊ ग्रह आहेत. मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने प्रत्येक राशीशी प्रत्येक ग्रहाचा संबंध येतो.
१०८ चे मूळ इतकेच मर्यादित नाही. कारण ही संख्या खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात सतत दिसून येते. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राला एका चक्रात १०८ बाधा (पथ) पूर्ण कराव्या लागतात आणि १०८ वेळा मंत्राचा जप केल्याने आपल्याला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवता येते.
शिवाय, खूप कमी लोकांना ज्ञात असलेलं तथ्य म्हणजे १०८ हे निर्मितीचे सुवर्ण गुणोत्तर देखील आहे. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सूर्याच्या व्यासाच्या १०८ पट आहे. त्याचप्रमाणे, चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे. १०८ चे हे सुवर्ण गुणोत्तर पृथ्वीवर जीवन निर्माण होण्याचे कारण आहे. चंद्र सतत बदलत असतो आणि जेव्हा चंद्राने या १०८ गुणोत्तरामध्ये प्रवेश केला तेव्हाच पृथ्वीवर जीवन फुलू लागले. आणि ज्या दिवशी या १०८ गुणोत्तरातून चंद्र सरेल, तेव्हा जीवनाचे अस्तित्व संपुष्टात येईल.
सूर्य आणि चंद्राच्या या संयोगानेच या अस्तित्वात जीवन निर्माण होण्यास मदत झाली आहे. आणि हा पैलू शिवरात्रीतही पाहायला मिळतो. प्रकट झालेल्या वास्तवामागे शिव आणि शक्ती यांचा संयोग आहे. ज्योतिषशास्त्रातही सूर्याचा स्वामी शिव आणि चंद्राची देवी शक्ती आहे.
ज्योतिषशास्त्राच्या स्थूल पातळीवर जाताना, सूर्याचे प्रतिनिधित्व वडील करतात आणि चंद्र आईद्वारे दर्शविला जातो. एका विशिष्ट वेळी त्यांच्या एकत्र येण्याने आपल्याला जीवन दिले, जसे सूर्य आणि चंद्र एका विशिष्ट मार्गाने एकत्र येण्याने ग्रहावर जीवन दिले. अनेक ज्योतिषी सांगतात की जर तुम्हाला तुमच्या ज्योतिषीय पत्रिकेवर/चार्टवर सूर्याचा प्रभाव सुधारायचा असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांची सेवा करावी. त्याचप्रमाणे, चंद्राचा प्रभाव सुधारण्यासाठी, एखाद्याने आपल्या आईची सेवा केली पाहिजे. जसे सूर्य आणि चंद्र, एक आई आणि एक पिता, त्याचप्रमाणे शिव आणि शक्ती यांचे एकत्र येणे ही संपूर्ण सृष्टी आहे. हे सर्व समान घटक आहेत, फक्त वेगवेगळ्या प्रकारे प्रस्तुत केले जातात.
तूम्हाला एखाद्या मंत्रात दीक्षा घ्यायची असेल, जसे की गायत्रीची दीक्षा घेण्यासाठी उपनयनम करायचे असेल किंवा एखादा साधा दैनंदिन मंत्र घ्यायचा असेल किंवा रुद्रमसारखा शक्तिशाली अनुभव घ्यायचा असेल, तर जपाचे फायदे नाकारता येणार नाहीत. तुमच्या दैनंदिन जीवनात ही एक छोटीशी सवय लावल्याने अनेक सूक्ष्म आणि स्थूल फायदे मिळू शकतात.
आशुतोष चावला, प्रमुख, ज्योतिष आणि वास्तू, वैदिक धर्म संस्था यांच्या माहितीवर आधारित. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञानाच्या भाषणामधील माहितीतून.





